– कोरोना चा आकडा 274 वर
रामटेक – भगतसिंग ,टिळक आंबेडकर वार्ड तर ग्रामीण भागात मनसर ,नगरधन ,शीतलवाडी, भोजापूर अशे ऐकून 18 जन कोरोना पॉझिटिव. निघाले असुन रामटेक शहरात कोरोनाचा ग्राफ चढतीवर आहे . दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रामटेक शहरात 2 पोलीस कर्मचार्यांसह , भगतसिंह वॉर्ड येथील एकाच कुटुंबातील 80 वर्षाचं वृध्द, 48 वर्षाचा पुरुष तर 13 वर्ष मुलगा ,
तर आंबेडकर वॉर्ड येथील 38 वर्षाची महिला आणि टिळक वॉर्ड येथील 4 असे ऐकून 10 शहरातील तर ग्रामीण भागात शितलवाडी येथील शिवनगर येथे 23 वर्षाची महिला व एकाच कुटुंबातील 40 वर्षाची महिला व त्या महिलेचा 13 वर्षाचा मुलगा , तर नगरधन येथे 1, तर भोजापूर् येथे 2 असे
ग्रामीण व शहर मिळून ऐकून 18 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शहरात व ग्रामीण भागात ऐकून संक्रमितांची संख्या 274 वर पोहोचली आहे .कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आतापर्यंत 7 लोकांचा कोरोना मूळे मृत्यू झाला आहे. तहसीलदार बाळासाहेब मस्के , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत..
कोरोनाचा आकडा वाढतीवर असून बाहेर पडताना काही नागरिक मास्क लावत नाही आहेत, काही नागरिक सोशल डिस्टंसिंग चा सर्वत्र फज्जा करत आहे. काही नागरिक अजूनही कोरोना बाबत जागृत नाही आहेत. शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग वाढल्या मागे प्रशासकीय यंत्रणेचा कमीपणा कारणीभूत तर नाही ना अशी चर्चा जागरूक नागरिकांमध्ये आहे. तहसिलदार बालासाहेब मस्के यांनी नागरीकांना आवाहन केले की कोणतीही लक्षणे असल्यास डाक्टर कडे जाऊन त्वरीत स्वतःची तपासणी करुन सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.