Published On : Thu, Aug 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

साई नगरी ले-आऊट कांद्री मध्ये शासनाची दिशा भुल करित प्लॉटधारकांची केली फसवणुक

Advertisement

– फसवणुकीने प्लॉटधारकांनी पत्रपरिषदेत केली ले-आऊट मालकांवर कारवाई ची मागणी.

कन्हान : – ग्रा प कांद्री वार्ड क्र ६ साई नगरी नावाने अजय शेंदरे यांनी दाभाडे तळेगाव अंतर्गत योजना जुलै २००४ मध्ये टाकलेले ले-आऊट मंजुर झालेल्या प्लॉट ची विक्री न करता बोगस नकाशे व इतर कागद पत्रे बनवुन त्यात अनाधिकृत, नियम बाह्य ले-आऊट टाकुन पीयु लँड, नाली, रोड साठी सोडलेली जागा आणि शासकीय पांधन ही कोटयावधी रूपयात विक्री करून शासनाची दिशाभुल व प्लॉट धारकांची फसव णुक केल्याचा आरोप करित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्लॉट धारकांनी पत्रपरिषदेत केली आहे.

Advertisement
Today's Rate
Wed 18 Dec. 2024
Gold 24 KT 76,900/-
Gold 22 KT 71,500/-
Silver / Kg 89,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पारशिवनी तालुक्यातील ग्राम पंचायत कांद्री मौजा अंतर्गत गहुहिवरा रोड वार्ड क्र.६ येथे गैरअर्जदा र अजय बाबुराव शेंदरे वय ४७ वर्ष, अविनाश बाबुराव शेंदरे वय ४५ वर्ष, सुमन बाबुराव शेंदरे सर्व राह. संता जी नगर कांद्री-कन्हान हयानी साई नगरी नावाने टाक लेला ले-आऊट पुर्णपणे अनाधिकृत व नियम बाहय आहे. सदर ले-आऊट भुखंड विकास योजना अंतर्गत युएलसी अँक्ट १९७६ नुसार तळेगाव दाभाडे द्वारे खस रा क्र.२५५/२ मौजा कांद्री ता. पारशिवनी जि. नागपुर चे ३.३६ आर (३०८०० मीटर स्केअर) जागे मधुन (१६६८८.४० मीटर स्केअर ) इतकी जागा प्लॉट करि ता शासनाने मंजुरी दिली होती. तर उर्वरित जागा ही पीयु लॅन्ड, ओपन स्पेस, तळेगाव दाभाडे मध्ये सुटलेली जागा, रेसिडेंट साठी सुटलेली जागा व रेटनेबल करिता सोडण्यात आलेली जागा. वर्तमान वेळेस दिसत नाही. सदर ले-आऊट जुलै २००४ मध्ये ओमशंकर एस.गुप्ता यांच्या नावी होता. गैरअर्जदारास ती जमीन नियमानु सार विकली परंतु गैरअर्जदार यांनी २००४ मध्ये मंजुर केलेल्या योजने प्रमाणे ४६ प्लॉट न विकता १४९ प्लॉट चा बनावटी नकाशा तैयार करून सरकारी लैन्ड,ओपन स्पेस, पीयु लॅन्ड, सरकारी पांधन व शासकीय योजने तील जागेवर प्लॉट पाडुन प्लॉट धारकांना विकुन फस वणुक केली.

तसेच शासनाची दिशाभुल करून शास नाच्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवुन दुय्यम निबं धक कार्यालय पारशिवनी येथे खोटया नकाश्याच्या आधारावर रजिस्ट्री लावुन दिली. या प्लॉट विक्री मध्ये गैरअर्जदारानी कोठ्यावधी रूपया कमावला आहे. विशेष म्हणजे गैरअर्जदार अजय बाबुराव शेंदरे यांच्या वर नागपुर शहर पोलीस आयुक्त राजमाने साहेबांनी गुन्हा दाखल करून २२ दिवस तुरूंगात ठेवले. असे अनेक प्रकरण त्यांचेवर नोंद आहे. त्यांच्या परिवाराती ल ज्योती अजय शेंद्रे ही कांद्री सरपंच असतांना पीयु लँड आणि ओपन स्पेस न सोडता बोगस कागदपत्रा च्या व नकाशाच्या आधारावर टँक्स लावुन दिल्याने सरपंच पदाचा दुरूपयोग केल्याने ज्योती अजय शेंदरे ला सुध्दा ३४ मध्ये आरोपी बनविण्यात यावे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाने या ले-आऊट मधिल रजि स्ट्री व कुठलेही कागदपत्र तयार करून देऊ नये. याची खबरदारी रजिस्टार नी घ्यावी. नागपुर जिल्ह्यात कित्ये क गरीब लोकांची जागा हडपुन तेथे बोगस ले-आउट टाकुन प्लाट विकुन नागरिकांची फसवणुक करित आहे. अजय शेंदरे व त्याची टोळी अश्याच प्रकारे फस वणुकीचे काम करून अवैध कोट्यावदी, अरबो रूपये जमविल्याने त्यांची शहानिशा इन्कमटँक्स, ईडी, सी. आय.डी व सीबीआई मार्फत केल्यास नागपुर जिल्हा व विदर्भातील मोठा जमीन माफिया, लुटारू शासना पुढे येईल असा आभास आहे. जो शासनाशी धोकाध ळी करू शकतो तो कोणतेही गैर कृत्य करू शकतो. यात काही शंका नाही. शासनाची धोकाधळी करणा ऱ्या, प्लॉट धारकांशी धोकाधळी करणाऱ्या गैरअर्जदार अजय शेंदरे यांचेवर तात्काळ भुलक्षी प्रवाहाने गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आंदोलात्मक पवित्रा उचलण्यात येईल याची सर्व जवाबदारी शासन प्रशास नाची राहील.

प्लॉट धारक विलास पाडुरंग खोब्रागडे हा सामा न्य दलित परिवारातुन असुन आपल्या न्याय हक्कासा ठी व अधिकारासाठी मा. पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन कन्हान हयाना तक्रार अर्ज सादर करून गैर अर्जदारांवर कलम ४२०, ४०६, ४६८, ४६६, ४७१, १२०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली असुन मा. जिल्हाधिकारी नागपुर सह संबधित अधिका-यांना प्रतिलिपी देऊन न्यायाची मागणी केली आहे. गैरअर्जदार हे भु-माफिया असल्यामुळे अर्जदाराचा परिवाराला, अर्जादाराबरोबर राहणाऱ्या मित्रांना व अर्जदाराला धोका निर्माण झाला आहे. पत्रपरिषदेत विलास खोब्रागडे सह प्लॉटधारक मनोज मनगटे, मनोहर मोहुर्ले, किशोर मोहुर्ले, प्रदिप मोहोड, योगेश मोहोड, तेजस कुंबळे, राजेश गांजवे, ओमप्रकाश शास्त्रकार, प्रमोद शास्त्रकार, चंद्रशेखर शास्त्रकार, जितेंद्र वर्मा, हरिश वर्मा, सचिन मेश्राम, वामन डोंगरे, बब्रुवान घोडमारे, सुनील कुंभलकर, दिलीप मनगटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशांत सांगाडे, तहसिलदार पारशिवनी – साईनगरी लेआऊट मौजा कांद्री-कन्हान येथील प्रकरणाची तक्रार तहसील कार्यालय आलेली आहे.
दोन्ही पक्षकांराला नोटीस देऊन त्यांचा ज्या काही समस्या असणार त्यावर तोडगा काढण्यात येईल.

बलवंत पडोळे सरपंच कांद्री – प्लॉट धारकांकडुन ग्राम पंचायत कांद्री ला तक्रारी आल्या त्यानुसार संबधित विभागाला पत्रव्यवहार केला आहे. ले-आऊट धारकाला मालक्की हक्क अस लेले जमिनीचे सर्व कागदपत्र मागितले आहे. ले-आऊ टला याआधी असलेल्या बॉडीने मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळेस ज्योती शेंदरे सरपंच पदावर होत्या.

पुरावे सादर करण्यास कधीही सक्षम आहे- अजय शेंदरे
लेआऊट हा २००४ चा असुन गुप्ता यांच्या माल कीचा होता. त्यानी युलसी सोडविण्यासाठी नकाशा टाकला होता. त्यावेळेस त्यांचा पासुन मी २०१३ मध्ये विक्त घेतला असल्याने एन आय टी आलेली होती.पण जुना नकाशा २२ याला अंतीम मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे नवीन नकाशा एनआयटी मंजुरी करिता पाठ विण्यात आला. तळेगाव दाभाडे स्कीम मध्ये युलसी दोन वर्षात सोळवायची होती. २००४ मध्ये स्कीम बंद झाली आणी नकाशा पास करण्याचा अधिकार एन आय टी आल्याने मंजुरी करीता टाकण्यात आला. जर प्लाॅट धारकाला जुण्या नकाशावर प्रशासन आर एल मंजुरी देत असेल तर जुना नकाशा लाऊ. सामोर निवडणुक असल्याने मला आणि कुंटुंबाला बदनाम करण्याचा ठाव आहे. कन्हान शहरात कुणाचा ले-आ ऊटच्या नकाशाला एनआयटीची मंजुरी नाही. तरी प्लाॅट विक्री सुरू आहे. संपुर्ण ले-आऊट ची चौकशी शासन प्रशासन करायला हवी.

Advertisement