नागपूर:दक्षिण नागपूरमध्ये मागील चार निवडणुकांपैकी दोनवेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपला यश मिळाले आहे. भाजप व काँग्रेसने या निवडणुकीत जुनेच उमेदवार कायम ठेवले. भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते व २०१९ मध्ये अत्यल्प मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात पुन्हा लढत आहे. दोन्ही नेत्यांनी आपला अजेंडा काय याबाबत ‘नागपूर टुडे’ शी संवाद साधला.
निवडणुकीत 50 हजार मतांनी लीड घेणार -गिरीश पांडव
मी महाविकास आघाडीचा उमेदवार असून दक्षिण नागपूर मतदारसंघात मला जनतेचा मोठा पाठिंबा आहे. यंदाच्या निवडणुकीत माझा वीज निश्चित असून मी 40 ते 50 हजार मतांची लीड घेणार असल्याचे पांडव म्हणाले. मतदारसंघाचा विकास आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे माझे कटाक्षाने लक्ष असेल असेही ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात भाजपच्या आमदाराने या मतदारसंघाचा विकास केला नाही. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, याकडेही भर देणार असल्याचे ते म्हणाले.
बेरोजगारीचा नायनाट करून रोजगाराला प्राधान्य देणार- मोहन मते
दक्षिण नागपूर मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार देण्याची प्रयत्न करणार असल्याचे मत म्हणाले. यंदाही जनता मलाच निवडून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या सहाही मतदारसंघात भाजपाचा उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल असा दावाही मते यांनी केला आहे.