नागपूर :दिवाळी सणाच्या तोंडावर खाजगी बसेस प्रमाणे एसटी महामंडळही तिकिटीत वाढ करणार आहे. तिकिटाच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने तीन आठवडे ही भाववाढ राहणार आहे,सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी पाहता महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून तिकीट दरात वाढ करण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने अगोदरच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. अशातच खाजगी आणि एसटीच्या किंमतीत वाढ होत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. एसटीच्या तिकिटांची ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच मंगळवारच्या रात्री १२ वाजतापासून लागू होणार आहे.
ती २७ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. २८ नोव्हेंबरपासून नेहमीच्याच दराने तिकीट आकारले जाईल. तसेच ज्या प्रवाशांनी बाहेरगावी जाण्यासाठी एसटी तिकिटाचे आधीच बुक केले त्यानांही तिकीटाची उर्वरित १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.