नागपूर: शहारात येत्या आठवड्याभरात येणाऱ्या गणेशोत्सवसह ईद ए मिलाद सणानिमित्ताने कायदा सुव्यवस्था रखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. दोन्ही उत्सवाचे पार्श्वभुमीवर आज नागपूरच्या अजनी परिसरात असलेल्या सिध्देश्वर हॉल येथे परि.क.४ चे पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग शांतता समितीच्या पदाधिकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीस परिमंडळ क्र.०४ मधील पोलीस ठाणे अजनी, बेलतरोडी, हुडकेश्वर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, वाठोडा चे प्रभारी अधिकारी व गोपनीय अंमलदार तसेच मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य असे अंदाजे ४०० ते ५०० हजर होते.
या बैठकीत दोन्ही सणाच्या उत्सव तयारीच्या अनुषंगाने मंडळाच्या सुचना व अपेक्षा याबाबत चर्चा करून मंडळाचे पदाधिकारी व नागरीकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती अबाधीत रखण्याकरित पोलीस दल सक्षम असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यावर पोलीसांची करडी नजर असणार असल्याचे चांडक यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा शांततेत व सौजन्यपूर्ण वातावरणात साजरा होईल याकरीता जनतेस आवाहनही करण्यात आले.