नागपूर: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधान चौक येथे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व प्रदेश सचिव तथा प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, माजी आमदार डॉ. मिलींद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, सुनील मित्रा, भोजराज डुंबे, संजय बंगाले, श्रीकांतजी देशपांडे, संजय अवचट, विनोद कन्हेरे, किशोर पलांदूरकर, मनीषा काशीकर, लखन येरावार, सतीश डागोर, रवींद्र डोंगरे, अनिरूध्द पालकर, चंदन गोस्वामी, सतीश शिरसवान, संदीप जाधव, राजेश हाथीबेड, योगेश पाचपोर, नागेश सहारे, अजय करोसिया, संदीप माने, विराग राऊत, अमित गांजरे, बंडू शिरसाट आदी उपस्थित होते.