गोंदिया: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर पुन्हा टीका केली आहे.भाजपाची मानसिकता अहंकाराने भरली आहे. यामुळेच अनेक नेते पुढच्या काळात भाजपा सोडतील यावेळी केंद्रात भाजपाचे, मोदींचे सरकार येणार नाही. मग महाराष्ट्र आणि देशात भाजपाची अवस्था काय होईल, ते चित्र स्पष्ट आहे,असा दावा पटोले यांनी केला.
नाना पटोले गोंदिया येथे निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजप सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजप आणि त्यांचे नेते राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारीवर चर्चा का करत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा का करत नाही, गरिबांच्या प्रश्नावर चर्चा का करत नाही,असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले.
देशातील मतदारांनी ‘इंडिया’ आघाडीला निवडून द्यावे. मी आपल्या सभांमधून महाविकास आघाडीला निवडून द्यायचे आवाहन जनतेला करत आहे. मतदारांनी भाजपाच्या धर्म-जाती या मुद्यांपलीकडे मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे, असेही पटोले म्हणाले.