Published On : Sat, Dec 2nd, 2017

सायकल चालवत वित्त विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहचले कार्यालयात

Advertisement


नागपूर: पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूर्षण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्ती व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येवून पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे.

लेखा व कोषागारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजता सायकलने कार्यालयात आपली उपस्थिती नोंदविली. सिव्हील लाईन्स परिसरातील लेखा व कोषागारे विभागाच्या लेखा कोष भवन येथे सहसंचालक विजय एन. कोल्हे, तसेच जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखा अधिकारी अर्चना सोळंकी यांचेसह सुमारे पंचवीस अधिकारी व कर्मचारी सायकल संदेश अभियान सहभागी झाले होते.

प्रदूर्षणच्या समस्येमुळे राजधानी सारख्या शहरात निर्माण झालेली परिस्थिती तसेच इंधनाची बचत व शारिरीक सुदृढता यासाठी सायकल चालविणे हाच एकमेव पर्याय असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा यादृष्टीने वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून सायकलने कार्यालयात पोहचण्याचा निर्णय घेतला. सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी 10 वाजता विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारे येथील कार्यालयात सायकलने पोहचल्यानंतर आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सायकल चालवा व पर्यावरण वाचवा यासाठी लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे, सहाय्यक सहसंचालक शुभदा चिंचोळकर, एफडीसीएमचे सहाय्यक संचालक प्रशांत ठावरे, जिल्हा नियोजन कार्यालयाचे लेखा अधिकारी अर्चना सोंळकी, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या लेखा अधिकारी वर्षा हेजिप त्यांच्यासोबत वर्षा सहारे, निलेश माळी, प्रियंका पाठे, क्षितीज काळे, पंकज उबाळे, अशोक भजणे, स्वप्नील चौधरी, सचिन पाटील, शैलेश कोठे, आशिष जाधव, सतीश हिंगणे, सर्वश्री थोरात, वाघुडकर, वासनिक, अरोंधेकर, हेडाऊ, तिळकणे आदी कर्मचारी सायकल चालवा व पर्यावरण वाचवा यामध्ये सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement