कन्हान : – भारतीय जनता युवा मोर्चा व्दारे क्रिडा व कला महोत्सव अंतर्गत कन्हान येथे शनिवार ला रामटेक विधानसभा भव्य संगीतमय सोहळा उजाला गायन स्पर्धेत आशिष हटवार कन्हान प्रथम तर व्दितीय कु मोनिका वाघाडे देवलापार व सौ सरिता बावनकुळे हयाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .
आमदार डि. मल्लिकार्जुनजी रेड्डी आमदार व भारतीय जनता युवा मोर्चा रामटेक विधानसभा क्षेत्र व्दारे सी एम चषक कार्यक्रमांतर्गत शनिवार दि १५ डिसेंबर २०१८ ला सायंकाळी ६ वाजता कॉलरा सेलिब्रेशन लॉन मेन रोड कन्हान येथे उजाला गायन स्पर्धा रामटेक विधानसभा भव्य संगीतमय सोहळ्याचे मा आमदार डि मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ दिवटे, राजेश ठाकरे, नगराध्यक्ष शंकरराव चहांदे , उपाध्यक्ष मनोहर पाठक, जयराम मेहरकुळे, व्यकटेश कारेमोरे, रानु शाही, हिरालाल गुप्ता, राजेश शेंदरे, अजय लोंढे , सुनंदा दिवटे , आशा पनीकर, लक्ष्मी लाडेकर, सुषमा चोपकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
गायन स्पर्धेत ३० स्पर्धक सहभागी झाले असुन देशभक्तीपर गीत, सिनेमा गीत, भाऊ गीत, लावणी , गोंधळ, अभंग सुंदर गायन केले . यात आशिष हटवार कन्हान प्रथम तर व्दितीय कु मोनिका वाघाडे देवलापार व सौ सरिता बावनकुळे हयाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अमोल कडु संगीत वाद्य संच नागपुर हयानी सुंदर संगिताची साथ दिली.
उजाला गायन स्पर्धा संयोजक व भा ज यु मो पारशिवनी तालुका अध्यक्ष महेंद्र साबरे व जया खैरकर हयानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. गायन स्पर्धेच्या यशस्वीते करिता महामंत्री भाजयुमो नागपूर जिल्हा व सी एम चषक अभियान संयोजक अतुल हजारे, सह संयोजक राहुल किरपान, अालोक मानकर, मनोज कुरडकर, सौरभ पोटभरे, सुनिल लाडेकर, वीर सिंह, राजेश पोटभरे , विरेंद्र सिंह, संदीप कभे ,चंदन मेश्राम, आंनद शर्मा , मयुर माटे व पदाधिकारी, कार्यकर्तानी परिश्रम घेतले .