Advertisement
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निकाल स्पष्ट होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.
या मतदारसंघात भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. सहाव्या फेरीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्याहून सुमारे ३ हजार ४४० मते जास्त घेतली.
आतापर्यंत सलग पाच फेऱ्यात नितीन गडकरी आघाडीवर होते. सहाव्या फेरीनंतर नितीन गडकरी यांनी एकूण २ लाख २३ हजार ८१० मते मिळाली. तर विकास ठाकरे यांना १ लाख ७९ हजार ८५२ मते मिळाली आहेत.