Advertisement
नागपूर : देशभरात आज १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळाली.
महायुतीमध्ये भाजपच्या जागा आघाडीवर दिसत असल्या तरी शिंदे- अजित दादांचे शिलेदार पिछाडीवर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, मविआ ३० जागांवर तर महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष एका जागेवर पुढे आहे.
दरम्यान लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपाने २८, शिवसेना शिंदे गटाने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४ आणि रासपने १ जागेवर निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने २१, काँग्रेसने १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढवली होती.