Advertisement
नागपूर : बुद्धिबळ खेळात संकल्प गुप्ताला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवण्यात आला आहे.
संकल्प गुप्ता याने वयाच्या अठराव्या वर्षात 71 व्या ग्रँडमास्टर होण्याचा किताब पटकवला आहे.संकल्प गुप्ताने आईसोबत चेस खेळत आपला प्रवास सुरु केला. वयाच्या चौथ्या वर्षीपासून त्याने बुद्धिबळ खेळात पारितोषिक मिळवायला सुरवात केली.
तेच वयाच्या 18 व्या वर्षी एलो रेटिंग मिळवत 2021 मध्ये सरबियात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आहे. ( Grandmaster Sankalp Gupta ) 3 जीएम नॉर्म पूर्ण करत त्याने 2 हजार 504 वर येलो रेटिंग मिळवले आहे.