नागपूर : राज्यात सध्या सुरु असेलल्या मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. इतकेच नाही तर संघ मुख्यालय, भाजपा कार्यालय आणि ओबीसी नेत्यांच्या कार्यालय व निवासस्थानावरही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात अनेक आमदार आणि खासदारांच्या घरावर हल्ले करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यता आल्याचे सागंण्यात येत आहे. हे पाहता पोलिस विभाग कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीत.
दरम्यान मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आता उग्र होत असून दुसरीकडे राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने आज प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आला. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात होईल.