Published On : Mon, Nov 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावात काँग्रेसने गड राखला तब्बल १० जागांवर वर्चस्व !

Advertisement

नागपूर : राज्यातील 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी पार पडले. राज्यातल्या काही ग्रामपंचायतींचा बिनविरोध निकाल लागला असला तरी रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे.

या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथे १७ पैकी १० काँग्रेस, भाजप ६ तर अपक्ष १ जागा मिळाल्या आहेत , यात भाजप निशा खडसे यांचा पराभव झाला असून कॉंग्रेसच्या मंगला शेटे सरपंचपदावर विजयी झाल्या आहेत.

मतमोजणीत सुरवातीला संभ्रम निर्माण झाल्यामुळे तीन वेळा रिकाउंटिंग केल्यानंतर काँग्रेसचा सरपंच विजयी झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा येथे 17 पैकी 10 काँग्रेस, भाजप 6 तर अपक्ष 1 जागा मिळाल्या आहेत.

Advertisement