Advertisement
नागपूर : पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे हे पुन्हा एकदा बहुमताने निवडून आले आहे. भाजपच्या सुधाकर कोहळे यांना त्यांनी धूळ चारली. विकास ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या मैदानात उतरले होते. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस बंडखोरही रिंगणात असल्याने काँग्रेसपुढे हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान होते.
विकास ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली प्रश्नांची जाण ही त्यांची सकारात्मक बाजू ठरली.शिवाय त्यांच्या जनसंपर्कात सातत्य आहे. त्याचा त्यांना लाभ मिळाल्याने पश्चिम नागपुरातून पुन्हा आमदार झाले आहे. ठाकरे यांनी १० हजार मतांनी सुधाकर कोहळे यांना पराभूत केले.