नागपुर – जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथील विस्तारित इमारतिच्या चौथ्या माळ्यावरील खोली क्र.४१५ मध्ये महिला वकीलांच्या बार रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती देशपांडे , जिल्हा व सत्र न्यायाधीक-२ होत्या तर प्रमुख अतीथी म्हणून मुख्य न्यायदंडाधीकारी दंडे ,विशेष वकील, अॅड. ज्योती वजानी, वरिष्ठ वकील,अॅड. शीतल देव यांचेसह जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. रोशन बागडे, महासचीव अॅड. मनीष रणदीवे, उपाध्यक्ष अॅड.उषा गुजर व अॅड. आशिष नागपुरे, जिल्हा वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. कमल सतुजा, माजी महासचिव अॅड.नितीन देशमुख यांची विषेश उपस्थीती होती.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना सन्माननिय, न्यायाधीश श्रीमती देशपांडे , जिल्हा व सत्र न्यायाधीक-२ यांनी महिला वकीलांच्या दृष्टीने बार रूमची गरज व प्रासंगिकतेचे महत्व विषद करीत डीबीएच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या छोटेखानी कार्यक्रमास न्यायालयातील वकील बंधु व भगिनींची विशेष उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. ऊषा गुजर यांनी केले तर यशस्वीतेसाठी सहसचिव अॅड.संदीप बावणगडे, ग्रंथपाल ॲड. मनोज मेंढे, कार्यकारिणी सदस्य अॅड. सौरभ पोद्दार, अॅड. राजेश मानमोडे व संस्थेच्या पदाधीकाऱ्यांनी परीश्रम घेतले.