Published On : Wed, Nov 29th, 2017

‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे थाटात उद्‌घाटन

Advertisement

Raman Science
नागपूर: मागील २० वर्षांपासून अविरत आयोजित होत असलेला नागपुरातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या ‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले. नागपूर महानगरपालिका व असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार समिती येथे आयोजित या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व प्रयोगांची माहिती घेत महापौरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

उद्‌घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह मनपा आयुक्त अश्विन मुदगल, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांच्यासह असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूरचे सुरेश अग्रवाल, राजाराम शुक्ला, समर बागची, राजू मिश्रा, हरिश अड्याळकर, परमजित सिंग, राजू लाटा, अश्विन पांडे, प्रणिता खान, विज्ञान मेळाव्याचे समन्वयक कपिलनगर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर यांची उपस्थिती होती.

फीत कापून उद्‌घाटन केल्यानंतर महापौर नंदा जिचकार आणि अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व प्रयोगांच्या स्टॉल्सला भेट दिली. कुतुहलाने त्यांनी सर्व प्रयोगांविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शाबासकी देत त्यांच्यातील कुशाग्र बुद्धीचे कौतुक केले. मेळाव्याचे यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाच्या ज्योती मेडपीलवार, पुष्पा गावंडे, नीलिमा अढाऊ, संगीता कुळकर्णी, नीता गडेकर, मनिषा मोगलेवार, सुनीता झरबडे आदी सहकार्य करीत आहेत.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 94,100/-
Gold 22 KT 87,500/-
Silver / Kg - 92,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बिहार, कलकत्ता, कर्नाटकचे सादरीकरण
विज्ञान विषयात रूची असणारे आणि या विषयाला हसत-खेळत विद्यार्थ्यांसमोर ठेवणाऱ्या बिहार, कलकत्ता, कर्नाटक येथील काही शिक्षकांनाही अपूर्व विज्ञान मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. कलकत्ता येथून आलेले ऋषेंद्रु चक्रवर्ती हे अगदी रोजच्या वापरातील वस्तूंमधून ‘बल’ (force) कसे तयार होते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. कर्नाटक येथील चिकमट सी. एस. यांनी स्वत:च्या कल्पकतेतून भौतिकीय खेळ तयार केले असून विद्यार्थ्यांना सहज समजेल, असे ते आहेत. मध्यप्रदेशातील ग्वालियर येथून आलेले राजनारायण राजोरिया प्रतिमांच्या माध्यमातून गणितीय प्रमेय विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ‘जादूटोण्यामागील विज्ञान’ सांगत शासनाने अंधश्रद्धेविरोधात केलेल्या कायद्याची माहिती देत आहेत. नेचर क्लब ऑफ पटनाच्या स्टॉलवरून ओला आणि सुखा कचरा कसा विभक्त करायचा, याबाबत माहिती दिली जात आहे.

पथनाट्यातून जनजागृती
राष्ट्रभाषा प्रचार समिती परिवारातील सांस्कृतिक विंगच्या कलावंतांनी ‘खेल कूद का विज्ञान’ हे पथनाट्य सादर करीत विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनीही या पथनाट्याला भरभरून दाद दिली. अगदी आपल्या रोजच्या कार्यात विज्ञान कसे असते याबाबत हसत खेळत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

१ डिसेंबरपासून प्रश्नमंजुषा
२९ ते ३ डिसदेंबर दरम्यान चालणाऱ्या अपूर्व विज्ञान मेळाव्यात सहभागी सर्वांसाठी प्रश्नमंजुषा राहणार आहे. दिल्ली येथील विज्ञान प्रसार केंद्राचे सहकारी मेळाव्यात सहभागी होत असून १ ते ३ डिसेंबरदरम्यान ही प्रश्नमंजुषा राहील.

राज्याबाहेरील विद्यार्थीही देणार भेट
सन १९९८ पासून दरवर्षी अविरत सुरू असलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्याची ख्याती देशभरात झाली आहे. विविध राज्यातील शिक्षक मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आपल्या प्रयोगासह यात सहभागी होत असतात. यावर्षी परराज्यातील विद्यार्थीही मेळाव्यातील प्रयोग बघण्यासाठी सहभागी होणार आहेत. छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील विद्यार्थी मेळाव्याला भेट देणार आहेत. अमरावतीमधील सुमारे ४० शिक्षकही भेट देणार आहेत. सदर मेळाव्यात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे सादरीकरण बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी नागपूर शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थी भेट देणार आहेत. रविवार ३ डिसेंबर रोजी पालकांसाठीही मेळावा खुला राहील, अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली.

Advertisement
Advertisement