Advertisement
नागपूर : पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्र. ०४, नागपूर शहर कार्यालय कांबळे चौक, अजनी नागपूर शहर येथुन प्रशासकिय कारणास्तव प्लाट नं. २५९, २६० सुर्वे ले आऊट सक्करदरा तलावा, समोर, सक्करदरा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमात पोलीस आयुक्त यांच्यासह अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रा.वि. नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), सर्व पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क. ०४ अंतर्गत सर्व अधिकारी उपस्थित होते.
त्यामुळे शहरातील जनतेला पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क. ०४ मधील कार्यालयीन कामाकरिता प्लाट नं. २५९, २६० सुर्वे ले आऊट सक्करदरा येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.