कामठी:-नागरिकांना निदान पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून दिलेल्या सीएसआर निधीतून प्रभाग क्र 16 येथील शिव छत्रपती नगर मध्ये निर्माण झालेल्या जलशुद्धीकरणं संयंत्राचे उद्घाटन माजी सैनिक देवानंद राऊत व राजेश कोडापे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दरम्यान या दोन्ही माजी सैनिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.तसेच या जलशुद्धीकरण संयंत्राचे जवाबदारी वैभव लक्ष्मी बचत गट ला देण्यात आली.
या जलशुद्धीकरण संयंत्राचे उदघाटन व माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रमात प्रभाग क्र 16 चे नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेविका सावला सिंगाडे, भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी, संदिप कश्यप, नगरसेवक लालसिंग यादव,नगरसेविका ,संध्या रायबोले , उज्वल रायबोले , सतीश जैस्वाल, तसेच वैभव लक्ष्मी महिला बचत गट च्या पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संखेत उपस्थित होते
संदीप कांबळे कामठी