आज दहावीचा निकाल, अकरावीत सोशल मिडीयाही शिकवा!
सोशल मिडीया संवादाचं प्रभावी माध्यम आहे, त्यासोबतच गेल्या काही वर्षांत सोशल मिडीया शिक्षण, प्रशिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या वाटा शोधणारंही प्रभावी माध्यम झालंय. कोरोनाच्या या संकटात देशातल्या शाळा लॉकडाऊन असतानाच, याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिक्षणाची दारंही उघडी झालेली आपण बघीतली. त्यामुळेच तरुणाईच्या बोटांच्या इशाऱ्यावर जग जिंकण्याची ताकद असलेल्या या सोशल मिडीयाचा सैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करावा, मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केलीय सोशल मिडीया विश्लेषक अजित पारसे यांनी.
‘महाविद्यालयाची पायरी चढली, की पूर्वी स्मार्टफोन हातात यायचा. पण आता ऑनलाईनम शिक्षणामुळे लवकरंच स्मार्ट फोन मुलांच्या हातात यायला लागला आहे. १० वी पास झालेली मुलं ११ वी जाताना आपल्या करिअरच्या दृष्टीनं विचार करायला लागतात, आपली भविष्याची वाट निवडतात. या तरुणांना सोशल मिडीयारील विविध संधीचा फायदा व्हावा. सोशल मिडीयाच्या माध्यमातून फक्त वर्गखोलीत दिलेलं शिक्षण नाही, तर ग्लोबल व्हीलेज म्हणून जगभरातील ज्ञान, विज्ञान, अर्थकारण, संशोधन, कला, व्यवसाय, शेतीची माहिती मिळावी, यासाठी सोशल मिडीयासारखा विषय अभ्यासात असण्याची गरज जगभरातील बरेच तज्ज्ञ व्यक्त करतात.
२० वर्षे पुढे काय प्रगती होईल, याचा विचार करत आतापासूनंच त्या दिशेनं पावलं काटण्याची गरज आहे, सोशल मिडीयाचा अभ्यासक्रमात समावेश करुन, या दिशेनं एक पाऊल टाकता येणं शक्य आहे’ हिच विनंती करणारं पत्र सोशल मिडीया विश्लेषक अजीत पारसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलंय.
दहाविच्या निकालानंतर विद्यार्थी पास होऊन अकरावीत प्रवेश घेणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना जग समजाऊन घेण्यासाठी सोशल मिडीयाचा अकरावीपासून समावेश व्हावा, ही मागणी करण्यात आलीय. सोशल मिडीयाचा वापर फक्त अफवा पसरवणे किंवा समाज विघात कृत्यांसह विनाशकारी वृत्तीसाठी नाही, तर उद्याचं जग कवेत घेणाऱ्या तरुणांना विकासाच्या वाटा दाखवणारंही ठरु शकते. पण त्यासाठी राज्यकर्त्यांनी एक पाऊल पुढे टाकत, याचा सकारत्माक विचार गरज व्यक्त केली जातेय.