नागपूर : हवाला व डब्बा व्यवसायातील शहरातील नऊ व्यावसायिकांचे निवासस्थान आणि कार्यालयासह २० ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.सलग दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. डब्बा व्यवसायातील रवी अग्रवालच्या जाळ्यात शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अडकल्याची संशय आयकर विभागाला आला आहे.
कोलकातास्थित नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) मधून त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली आहे. 50 लाखांहून अधिकच्या फसवणुकीचा आयकर विभाग तपास करत आहे. सतत तपासात गुंतलेल्या आयकर अधिकाऱ्यांना रवी अग्रवालच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळाली आहे. या कागदपत्रांमध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी रवी अग्रवाल यांच्या शेल कंपनीकडून (ठेवी) मोठी रक्कम घेतल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. रवी अग्रवाल यांनी त्यांच्या एनबीएफसीचा पत्ता मुंबई असा दिला आहे, तर कोलकाता येथून सुरू असलेल्या कामाची माहिती दिली आहे.
आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार रवी अग्रवाल शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत हातमिळवणी करायचा त्याबदल्यात त्याची ३ ते ४ टक्के कमाई होत होती. या कार्यात रवी याच्या एल ७ चा मोठा वाट होता . ज्या माध्यमातून डब्बा व्यवसाय चालायचा.
शहराच्या हद्दीत रवी अग्रवाल यांचे ‘छतरपूर फार्म’ आहे. प्राप्तिकर विभागानेही येथे फोन करून शहरातील नामवंत अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलाविल्याची माहिती आहे. आयकर, पोलीस, ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांनी या छतरपूरमध्ये विशेष सेवा प्रदान करण्यात आली.
दागिन्यांच्या मूल्याच्या माध्यमातून रवी अग्रवालने ईडी अधिकाऱ्याशी ओळख वाढवली. त्या अधिकाऱ्याला छतरपूरचा शाही दौरा दिला. यासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत आयकर विभागाच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहे.
छतरपूरमध्ये नागपूरच्या अनेक कोट्यधीशांनी ‘वीला’ खरेदी केले आहे. यात शहरातील उद्योगपती, फळ विक्रेता, क्रिकेट बुकीज आणि मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर रवी अग्रवालच्या जाळ्यात शहरातील नामवंत बिल्डरही अडकले आहे. ज्यांनी रवीकडून कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. याबाबतचे कागदपत्रही आयकर विभागाच्या हाती लागले आहे.
प्यारे खानची होणार कसून चौकशी
आयकर विभागाच्या या कारवाईत प्यारे खान आल्याने अनेकांमध्ये खळबळ उडाली आहे. एकेकाळी ऑटो चालवणारा प्यारे खान आज करोडों-कोट्यांमध्ये खेळतोय. त्यांनी अल्पावधीत इतके पैसे कसे कमविले हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.