नागपूर : पूर्व नागपूर येथील राधाकृष्ण हॉस्पिटल हे चेरिटेबल हॉस्पिटल मध्ये सिलेंडरचा पुरवठा वाढविण्याकरीता एक निवेदन उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांना ट्रस्टचे संचालक श्री गोविंद पोदार आणि समाजसेवी श्री. मनोज अग्रवाल यांनी दिले. त्यांनी सांगितले की रुग्णालय सन १९९१ पासुन पूर्व नागपूर मधील नागरिकांना कमी फीस मध्ये सेवा देत आहे. कोरोना चा काळात हॉस्पिटल उत्तम सेवा देत असून तेथे कोरोना रुग्णांकरिता ११८ बेड ची व्यवस्था आहे. आता त्यांना १३० नग ऑक्सिजन सिलेंडर देण्यात येत आहे. पण त्यांची आवश्यकता २४० सिलेंडरची आहे.
तसेच या आठवडयात रुग्ण बघून २६ बेड वाढविण्यात येणार आहे. तेव्हा त्यांची ३०० सिलेंडरची आवश्यकता आहे. त्यांची तक्रार अशी होती की नागपूरातील अन्य हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये श्री. राधाकृष्ण हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. त्यामुळे तेथे रुग्णांचा ईलाज व्यवस्थीत करता येत नाही. करिता अन्य हॉस्पिटल प्रमाणे श्री. राधाकृष्ण हॉस्पिटलला सुध्दा ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा आवश्यकतेनुसार वाढविण्याकरीता सहकार्य करावे. उपमहापौर यांनी जिल्हाधिकारी यांना या संबंधात त्यांना मदत करण्याचे निवेदन केले आहे.