कन्हान: महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अर्थात कर्जमाफी योजनेची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी नागपूर याना निवेदन देऊन मा. शरद डोणेकर जि. प. नागपूर यांनी केली आहे.
शासन निर्णय दि. २८ जुन २०१७ व सुधारित शासन निर्णय ८ सप्टेंबर २०१७ अन्वये शेतक-यांचे दिड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिड लाखा वरिल कर्जाचा भरणा ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत केल्यास दिड कर्ज माफ होणार आहे. १ एप्रिल२००९ ते३१ मार्च२०१६-१७ पर्यंत कर्ज उचल केलेले या योजनेंतर्गत लाभ घेण्याकरिता १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागात पुरेपुर न झाल्याने व ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसुन काही तांत्रिक अडचणीतून अदयाप पर्यंत अनेक शेतक-यांचे अर्ज भरल्या गेले नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे संपुर्ण जिल्हयात ५० टक्के पेक्षा जास्त शेतक-यांचे अर्ज अदयापही भरले गेले नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधिच अनियमित निसर्गचक्रामुळे शेतकरी अडचणीत येऊन त्रस्त झालेला आहे. त्यावर कर्जमाफीमुळे काही प्रमाणात मिळणारा दिलासा अर्ज न भरण्या अभावी श्रीण होत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. करिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता आणखी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी जेणेकरून उर्वरित सर्व शेतक-यांना सदर कर्जमाफीचा फायदा होईल. अशी विनती शासनास मा. सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी नागपुर यांना निवेदन देऊन मा. शरद डोणेकर, उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपुर यानी केली आहे.