नागपूर: टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर निधनावर सर्व स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन तमाम भारतीयांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने भारताने एक अमूल्य रत्न गमावले आहे. भारताच्या विकास प्रवासात रतन टाटा यांचे योगदान अविस्मरणीय राहील. नवीन आणि प्रभावी उपक्रमांसोबतच त्यांनी उद्योगातील महत्त्वाच्या क्षेत्रात अनेक उत्कृष्ट मानके प्रस्थापित केली. समाजाच्या हितासाठी सर्व प्रकारच्या कामात त्यांचे सततचे सहकार्य व सहभाग कायम राहिला.
राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेचा मुद्दा असो किंवा विकासाचा कोणताही पैलू असो किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांचे कल्याण असो, रतनजी त्यांच्या अद्वितीय विचार आणि कार्याने प्रेरणादायी राहिले.
अनेक उंची गाठल्यानंतरही त्यांची साधेपणा आणि नम्रता ही शैली अनुकरणीय राहील. त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्ही आमचे विनम्र अभिवादन आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना, असे सरसंघचालक.डॉ.मोहन भागवत म्हणाले.