नागपूर: भारताचे चंद्रयान-३ अखेर चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भारतीयांनी चंद्रयान-३ च्या यशासाठी मोठा जल्लोष साजरा करत आहे.
भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण भारतासाठी नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझंही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडले गेले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सगळ्या वैज्ञानिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.