नागपूर: भारत 2047 पर्यंत विश्वगुरू होईल. तसेच अर्थव्यवस्थेतही नंबर 1 बनेल,असे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
धनखड म्हणाले की, जगाकडे बघा, जगाची अर्थव्यवस्था बिकट असतानाही आपली अर्थव्यवस्था दुहेरी अंकात वाढत होती, याचा आम्हाला अभिमान आहे. आपण कुठे असू सांगता येत नाही, सप्टेंबर 2022 मध्ये ऐतिहासिक वेळ आली जेव्हा भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यावर राज्य करणाऱ्या UK ला आपण मागे सोडले.या वर्षाच्या अखेरीस आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ.
सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, त्यावेळी आपल्यापैकी काही जण जिवंत नसतील, पण योद्धा म्हणून तुम्ही 2047 पर्यंत भारताला विश्वगुरू बनवून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवाल,असे विधान उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.