नागपूर : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान दिले होते..हे आव्हान भारताने 4 गडी राखून पूर्ण केले. यासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल फेरीत धडक मारली आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीची खेळी निर्णायक ठरली. खरं तर या मैदानावर 265 धावांचे लक्ष्य गाठणं कठीण होते. पण टीम इंडियाने विजय मिळवून दाखवला. भारताने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.केएल राहुलचा विजयी षटकार आणि भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपचा बदला घेत कांगारूंचा पराभव केला आहे. दरम्यान 2013 मध्ये जेतेपद, 2017 पाकिस्तानकडून पराभव आणि आता पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
