Published On : Wed, Apr 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश , चीनलाही टाकले मागे

Advertisement

एकीकडे भारत देशात जनसंख्या कायदा आणण्याच्या घडामोडींना वेग आला होता. मात्र आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशाच्या यादीत भारत अव्वल स्थानी असल्याचे समोर आले आहे. लोकसंख्या वाढीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) 2023 च्या ताज्या आकडेवारीनुसार याबाबतची माहिती समोर आली आहे.

भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या आता 40 कोटींच्याही पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर भारताच्या तुलनेत घसरल्याचे चित्र आहे.

Today’s Rate
Wednesday 10 Oct. 2024
Gold 24 KT 75,100 /-
Gold 22 KT 69,800 /-
Silver / Kg 89,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

युनायटेड नेशन्सच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. 1950 ते 2023 या कालावधीत युनायटेड नेशन्सने नोंदवलेल्या लोकसंख्येचा तक्ता पाहिला तर भारताची लोकसंख्या 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.9 दशलक्ष इतका मोठा फरक दिसून येत आहे.

Advertisement