Published On : Tue, Dec 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

फुले संचलित भारतातील पहिली मुलींची शाळा ‘जमीनदोस्त’ ;भिडे वाड्याची जीर्ण इमारत उद्ध्वस्त !

फुले स्मारक होण्याचा मार्ग मोकळा
Advertisement

नागपूर : पुणे महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे भिडे वाड्याची जीर्ण इमारत उद्ध्वस्त केली, जिथे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या एक महिन्यानंतर ही इमारत पाडण्यात आली. यादरम्यान परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.

दगडूशेठ गणपती समोरील याच वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली होती. या जागेवर स्मारक व्हावं अशी अनेक वर्षांची मागणी होती. मात्र भाडेकरूंसोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित होता.

Today’s Rate
Monday 30 Sept. 2024
Gold 24 KT 75,900/-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 91,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पीएमसीला जागेवर राष्ट्रीय स्मारक बांधण्याचा मार्ग मोकळा केला. जीर्ण इमारतीतील दुकान मालक आणि भाडेकरूंना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले.ही जागा मोकळी झाल्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे.

Advertisement

ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला 13 वर्षे उच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला. 80 सुनावण्यांमध्ये भक्कमपणे बाजू मांडून याच ठिकाणी मुलींची पहिली शाळा भरली होती, हे न्यायालयात सिद्ध करून दाखवले.न्यायालयाने हे मान्य करत सावित्रीच्या लेकींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणारा हा ऐतिहासिक भिडेवाडा कायदेशीर कचाट्यातून मुक्त केला. या कारवाईमुळे भिडे वाड्याच्या जागेवर ऐतिहासिक स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.