नागपूर :ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्या निधनावर नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित रतन टाटा हे पहिले व्यक्ती होते ज्यांच्यासाठी सामान्य लोकांनी त्यांना भारतरत्न देण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. रतन टाटा हे देशातील एकमेव उद्योगपती होते ज्यांनी आपल्या संपत्तीचा जास्तीत जास्त हिस्सा दान केला. रतन टाटा त्यांच्या औदार्यासाठी जगभर प्रसिद्ध होते. 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत जन्मलेल्या रतन टाटा यांना सर्व सुख आणि आदर वारसा मिळाला असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. रतन टाटा यांनी यासाठी खूप संघर्ष केला.रतन टाटा यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली असून सर्व स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.