नागपूर: केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वास्थ व परिवार मंत्रालय दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा (NQAS) अंतर्गत नागपुरातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८५.२ टक्के गुण प्राप्त झाले असून, महाराष्ट्र राज्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
मंगळवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, डॉ. अश्विनी निकम, डॉ.राजेश बुरे, श्री. निलेश बाभरे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिकउर रहेमान खान, इंदोरा यूपीएचसी येथील जीएनएम श्रीमती सील्विया सोनटक्के, श्रीमती वर्षा चव्हाण, फार्मसीस्ट श्रीमती सोनाली सरोदे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.