नागपूर मधील जट्टेवार सभागृह येथील कोविड केअर सेंटर च्या वतीने आज जागतिक परिचारिका दीना निमित्य कार्यरत असलेल्या एकूण 55 परिचारिकांचे व आरोग्य कर्मींचे प्रत्येकी 90000/- रुपयांचे मेडिक्लेम करुन आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.मागील 1 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या भीषण महामारी ने त्रासले असून असंख्य लोकं मृत्युमुखी पडले आहेत.परंतु दिवसरात्र न थकता न थांबता सर्व आरोग्यकर्मी आपली सेवा देत आहेत.
15 दिवस सेवा देऊन स्वतःला 15 दिवस घरच्यांपासून दूर ठेवणारे आरोग्यकर्मी यांनी युद्ध पातळीवर या संकटाची धुरा सांभाळली असून याची एक छोटीशी परतफेड म्हणून आज आमच्या सेंटर च्या वतीने हा निर्णय घेतला आहे. कोरोना चा प्रभाव संपेपर्यंत शासन मान्य दरामध्ये सर्व रुग्णांना निरंतर सेवा देत राहू असे असे व्यवस्थापणा द्वारे सांगितले आहे.रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय स्टाफ सुद्धा उपलब्ध होत नसून आपल्या सेवेला ज्यांनी यामुळे गालबोट लागू दिले नाही अश्या सर्व परिचारिकांच्या व आरोग्य कर्मींच्या कार्याला सलाम.