Advertisement
नागपूर: भारतात फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडिया अकाऊंट डाऊन झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फेसबुक अचानक लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन असल्याने वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक बंद पडले. पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही. फेसबुकच्या होम पेजवर तुम्ही जाऊच शकणार नाही.तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल फेसबुक देणार अधीकृत उत्तर –
लॉग आऊट परिणाम इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार असल्याची माहिती समोर येत आहे.