Published On : Mon, Jul 31st, 2023

महात्मा गांधींचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही ; देवेंद्र फडणवीसांचा भिडेंना इशारा

Advertisement

नागपूर : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यात मोठा वाद पेटला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

महात्मा गांधी असोत वा स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्ही कोणाच्याही विरोधात बोलणे खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी भिडेंना दिला. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत.देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्यांच्याकडे एक महान नायक म्हणून पाहिले जाते.एवढ्या महान नायकाबद्दल असे विधान करणे चुकीचे आहे.

Advertisement

भिडे गुरुजींनी असे विधान करू नये कारण अशा विधानांमुळे लाखो लोकांमध्ये संतापाची लाट पसरेल. महात्मा गांधी यांच्या विरोधात बोलणे जनता कदापि सहन करणार नाही. याबाबत राज्य सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान ही संस्था चालवतात. त्यांचा भाजप पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाला राजकीय रंग देण्याचे कर नाही, असेही फडणवीस म्हणाले.