Advertisement
नागपूर: अजनी येथे होऊ घातलेल्या इंटरमॉडेल स्टेशन विकसित करण्यासाठी जी झाडे कमी केली जातील, त्यापेक्षा 5 पट अधिक व उभी असलेली झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शंकरपूर येथील वनविभागाच्या जमिनीवर लावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका ट्विटवरून दिली.
या प्रकल्पात उड्डाण पूल आणि त्याला जोडले जाणारे अॅप्रोच रोड यासाठी 408 झाडे कमी होतील. तसेच इंटरमॉडेल स्टेशन हे 44.4 एकर जमिनीवर विकसित होणार आहे. या प्रकल्पात 4522 झाडे कमी होतील. त्याबदल्यात प्राधिकरण पाचपट अधिक झाड्यांची लागवड करणार आहे.
अधिक सुविधा, निवासी गाळे, दुकाने या जमिनीवर होणार आहेत. हे सर्व करताना 2023 झाडे वाचविण्यात आली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.