Published On : Wed, Sep 6th, 2017

मॉरिस कॉलेज टी-पॉइंट रोड वर आंतरजोडणीचे काम ८ सप्टेंबर रोजी

Advertisement

File Pic

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रोड ते मॉरिस कॉलेज टी-पॉइंट येथे ७००मिमीच्या अस्तित्वात असलेल्या लाईनची नवीन लाईनसोबत आंतरजोडणी करण्याचे काम दि. ८ सप्टेंबर २०१७ रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे.
येथे उल्लेखनीय आहे कि, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रोड ते मॉरिस कॉलेज टी-पॉइंट दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम करून ७००मिमीची वाहिनी स्थलांतरित करण्यात आली आहे.

आंतरजोडणीचे काम ८ सप्टेंबर, २०१७ रोजी सकाळी ९ वाजता सुरु केले जाईल आणि सुमारे १८ तास म्हणजे ९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत चालेल.

या दरम्यान खालील जलकुंभांचा/भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वंजारी नगर (नवीन) जलकुंभ: वंजारी नगर, कुकडे लेआऊट, कौशल्या नगर, नवा बाभूळखेडा, जोशीवाडी, जुना बाभूळखेडा, वसंत नगर २ विलास नगर.

वंजारी नगर (जुने) जलकुंभ: रघुजी नगर, सोमवारीपेठ, तुकडोजी नगर, पोलीस क्वार्टर्स, आयुर्वेदिक लेआऊट, आयुर्वेदिक कॉलेज, विश्वकर्मा नगर.

हनुमान नगर (बुधवार बाजार) जलकुंभ: हनुमान नगर, चंदन नगर, PTS क्वार्टर्स, महेश कॉलोनी, वकीलपेठ, हजारेवाडी, बुधवार बाजार, प्रोफेसर कॉलोनी, सोमवारी क्वार्टर्स, रेशीमबाग, सिरसपेठ.

रेशीमबाग जलकुंभ: जुनी शुक्रवारी, लभानतांडा, भगत कॉलोनी, महावीर नगर, गणेश नगर, शिव नगर, गायत्री नगर स्लम, ओम नगर, आनंद नगर, सुदामपुरी, नेहरू नगर, जुने नंदनवन.

मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसे पाणी साठवण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

पाणीपुरवठ्यासंबंधी कुठल्याही माहिती वा तक्रारींसाठी १८००२६६९८९९ वर संपर्क करावा.

Advertisement