नागपूर :महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धा अमरावती येथील ‘संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह’, येथे दि. २० व २१ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडणार आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल हे राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थिती संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण राहणार आहे. याप्रसंगी मुख्य अभियंता (गुणवत्ता व नियंत्रण नागपुर) सुहास रंगारी, गोंदीया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिष गजबे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेत शुक्रवार दि. २० संप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नागपुर परिमंडळातर्फ़े आनंद नाडकर्णी लिखित ‘त्या तीघांची गोष्ट’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे, यानंतर दुपारी २ वाजता गोंदीया परिमंडळातर्फ़े सलीम शेख लिखित ‘फ़तवा’ तर सायंकाळी ६ वाजता अकोला परिमंडळातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘जननी जन्म भुमिश्च’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल. स्पर्धेच्या दुस-रा दिवशी शनिवार दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता चंद्रपूर परिमंडळातर्फ़े प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानीमनी’ तर दुपारी २ वाजता अमरावती परिमंडलातर्फ़े हेमंत एदलाबादकर लिखित ‘एका ब्लॉकची गोष्ट’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल.
दोन दिवस चालणा-या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांच्या अध्यक्षतेत आणि कार्यकारी संचालक (प्रकल्प) चंद्रशेखर येरमे, कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (वितरण) अरविंद भादीकर आणि नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल, असे नाट्यस्पर्धेच्या स्वागताध्यक्षा तथा अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी कळविले आहे.