नागपूर: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई झोनल युनिटने नागपूर विमानतळावर एका कथित आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 1.80 कोटी रुपये किमतीचे 3.35 किलो सोने जप्त केले.
माहितीनुसार,एनसीबी पथकाने ए खान नावाच्या भारतीय नागरिकाची ओळख पटवली जो जेद्दाह, सौदी अरेबिया येथून नागपूरला परतत होता.टीमने त्या व्यक्तीचे फ्लाइट डिटेल्सही ओळखले. त्यानंतर हे पथक नागपुरात आले दाखल झाले. मध्यरात्री जेद्दाहुन नागपूर विमानाने येथे आलेल्या खानला एनसीबी पथकाने रोखले.
एनसीबीने जारी केलेल्या पत्रकानुसार एनसीबी मुंबईने नागपूर विमानतळावर 3.35 किलो सोन्यासह एका आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्कराला अटक केली. ही व्यक्ती सौदी अरेबियातून येत होती आणि ते सोने दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवणार होते.
खान पेस्टच्या स्वरूपात सोने घेऊन जात होता आणि त्याने ते सात पॅकेटमध्ये साठवले होते जे त्याने त्याच्या जीन्सच्या आतील बाजूस लपविले होते. ए खानने एनसीबी अधिकार्यांसमोर सोन्याची तस्करी कारण्यासंदर्भात कबुली दिली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खान गेल्या तीन वर्षांपासून सौदी अरेबियास्थित कंपनीत काम करत होता.