Published On : Sat, Jul 14th, 2018

महावितरणचे मीटर वाचनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान

नागपूर :आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महावितरणचे नाव सदैवच आघाडीवर आहे. मीटर वाचना मध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाथी व त्यादृष्टीने भविष्यात मीटर वाचनात येणा-या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने ग्राहकांकडील वीज मीटरवरील नोंदी घेण्यासाठी स्वयंचलीत मीटर वाचनासारखी आधुनिक यंत्रणा महावितरणतर्फ़े वापरल्या जात आहे.

महावितरणचे आज राज्यात सुमारे 2 कोटी 54 लाख उच्च दाब व लघु दाब वीज ग्राहक असून त्यांच्या वीज वापराच्या नोंदी घेण्यासाठी स्वयंचलीत मीटर वाचन, कॉमन मीटर रिडींग इन्स्ट्रुमेंट, मोबाईल ॲप, फ़ोटो मीटर रिडींग या अत्याधुनिक मीटर वाचनाच्या पद्धती सोबतच रेडीओ फ़्रिक्वेन्सी व इन्फ़्रारेड मीटर, प्री-पेड वीज मीटर यासारखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान असलेल्या वीज मीटरचा वापर करण्यात येत आहे.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय ग्राहकांच्या मीटर वाचनाप्रमाणे वीज बिल मिळण्याबाबतच्या तक्रारींच्या निराकरणासाठी महावितरणने ऑक्टोबर 2016 पासून राबविलेल्या मोबाईल ॲप या संकल्पनेमुळे मीटर वाचनाचा स्थळाच्या अक्षांश व रेखांशाची नोंद मीटर वाचनासह घेण्यात येत असल्याने मीटरचे सदोष वाचन पुर्णत: संपुष्ठात आले आहे.

मीटर वाचनासाठी आधुनिक एएमआर आणि एमआरआय प्रणाली
महावितरणला सर्वाधिक व हमखास महसुल मिळवून देणा-या उच्चदाब ग्राहकांसाठी स्वयंचलीत मीटर वाचन (एएमआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याव्दारे ग्राहकांच्या मीटरजवळ बसविलेल्या इंटरनेट मोडेमेच्या सहाय्याने थेट महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्वरमध्ये मीटर वाचनाच्या नोंदी दर महिन्याला नोंदविल्या जात आहेत. याशिवाय सिटी ऑपरेटेड मीटरचे वाचन करण्यासाठी मीटर वाचक साधनाचा (एमआरआय) साधनाचा वापर करून ग्राहकांकडील मीटरवरील वीज वापराच्या नोंदी थेट संगणक प्रणालीमध्ये नोंदविल्या जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आरएफ़ आणि आयआर मीटर
राज्यात महावितरणने तब्बल 64 लाखावर ग्राहकांकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या रेडीओ फ़्रिक्वेन्सी (आरएफ़) व इन्फ़्रारेड (आयआर) वीज मीटर बसविले असून त्यांचे वाचन हॅन्डहेल्ड युनिटच्या सहाय्याने घेतल्या जात आहे, या युनिटव्दारे मानवी हस्तक्षेप रहित स्वयंचलीतरित्या प्रत्येक मीटरचा तपशील, मीटर वाचन आदी माहिती एकत्रित करून थेट महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये हस्तांतरित केल्या जात आहे.

प्री-पेड मीटर
वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीला चाप लावण्यासाठी महावितरणने प्रायोगिक तत्वावर प्री-पेड मीटरचा वापर सुरु केला आहे, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या परवानगी नुसार मोबाईल रिचार्ज प्रमाणे भरलेल्या पैश्याच्या अनुषंगाने ग्राहकाला वीजेचा वापर करता येत असून रिचार्जची रक्कम संपण्यापुर्वी ग्राहकाला त्याची आगाऊ सुचना मिळण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. सध्या राज्यात 25 हजार ग्राहकांकडे प्री-पेड मीटर बसविन्यात आली आहेत.

मोबाईल ॲप व एसएमएस सुविधा
महावितरणने स्वत: विकसित केलेली मोबाईल ॲपची सुविधा ऑक्टोबर 2016 पासून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असून यामार्फ़त मीटर वाचन परस्पर माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्वरमध्ये पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना मानवी हस्तक्षेपरहित अचुक वीजबिल देणे शक्य होत आहे. याशिवाय या ॲपच्या मदतीने ग्राहकालाही त्याच्या वीज मीटरवरील रिडींग महावितरणच्या सर्व्हरवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ॲपद्वारे मीटर वाचन होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंद केलेल्या वीज ग्राहकांना मीटर वाचनाची माहिती देणारा एसएमएस पाठविण्यात येत असून एखाद्या ग्राहकाकडील मीटर वाचन काही अपरिहार्य कारणास्त्व झाले नसल्यास सदर ग्राहकाला ॲपव्दारे मीटर रिडींग पाठविण्याची विनंती एसएमएसच्या माध्यमातून केल्या जाते. याशिवाय ग्राहकांकडील मीटर वाचन, वीज वापर, त्यांना आलेले वीज बिल, बील भरणा करण्याची अंतिम मुदत आदी माहितीही एसएमएस व्दारे मोबाईल क्रमांक नोंदणीकृत ग्राहकाला दिल्या जात आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत वीज ग्राहकाला उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर असलेल्या महावितरणने वीज देयकांमधील मानवी हस्तक्षेप पुर्णत: बंद केल्याने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Advertisement