नागपूर :जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे.यापार्श्वभूमीवर नागपूर महापालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
आपल्या दैनंदिन जीवनशैलीत योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे.निरोगी आरोग्यासाठी रोज योगसाधना करा.
मी कितीही व्यस्ततेत दररोज सकाळी दोन तास प्राणायाम आणि योगासन करीत असतो. नियमित योग केल्याने औषधांची गरज भासत नाही. त्यामुळे तुम्हीही नियमित योग करा असे आवाहन गडकरी यांनी केले.
दरम्यान कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या सीईओ सोम्या शर्मा, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे खांडवे गुरुजी, आमदार टेकचंद सावरकर, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर आदी उपस्थित होते.