नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नागपुरात आलेल्या अतिवृष्टीमुळे नाग नदीला पूर येऊन हजारो कुटुंबांचे नुकसान झाले.नागपुरातील पूरग्रस्तांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनातही विशेष पॅकेज देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. यावरून उद्धव ठाकरेंनी नागपूरला पाण्यात बुडविणाऱ्यांची करा चौकशी करा, असे विधान केले आहे.
मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तसेच नगरविकासचे प्रभारी उदय सामंत यांनी दिले आहेत. यावर राज्यातील सर्व महापालिकेच्या चौकशी करा, असे आव्हान ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केले. णेशोत्सवादरम्यान नागपूरला पाण्यात बुडविणाऱ्या विकासपुरुषांची चौकशी करावी सोबतच पीएम केअर फंडाचीही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र बहाल करुन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन मोठा वाद पेटला आहे. अशातच आता राज्य मागसवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या कामात सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. हा मुद्दा आता विरोधकांनी नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात उचलून धरला आहे.
मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन आमदारांचा दबाव होता. त्यांच्या राजीनाम्यात काय दडलंय, हे पुढे यायला हवे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणीही ठाकरेंनी केली.