Published On : Mon, Jul 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

विषारी औषध प्राशन करून इसमाची आत्महत्या

Advertisement

कामठी :-कामठी रोड वरील कपिलांश कंपनीत मजूर पदी कार्यरत असलेल्या कन्हान टेकाडी रहिवासी इसमाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असुन मृतक इसमाचे नाव चक्रधर रामकृष्ण बोबडे वय 50 वर्षे रा टेकाडी कन्हान असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक इसम हा रात्री आपल्या घरी असतेवेळी घरात लपवुन ठेवलेले सेल्फओस नावाचे विषारी औषध प्राशन केले.घरमंडळींना सदर घटनेची कुणकुण लागताच मृतक इसमाच्या मुलाने तात्काळ कामठी च्या माहुरे हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ हलविले दरम्यान सदर इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहीती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यासंदर्भात पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement