मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते.अखेर यावरून आज पडदा उठला असून देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. भाजप पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे.मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला बहुमत मिळाले.त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत.
मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा मार्ग आज मोकळा झाला.