Published On : Sun, Jul 8th, 2018

लोकशाही वाचवण्यासाठी इमान राखणे आवश्यक

Advertisement

मुंबई: देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे, लोकशाही संकटात आहे, मतदारांचं इमानच तिला पराभूत करू शकेल. मुंबईच्या शिक्षकांनी ते इमान दाखवून लोकशाहीच्या लढ्याला नवं बळ दिलं आहे, असे प्रतिपादन समाजवादी नेते, लोकतांत्रिक जनता दलाचे संरक्षक खासदार शरद यादव यांनी आज केले. आमदार कपिल पाटील यांच्या विजयाची हट्रिक झाल्याच्या निमित्ताने शिक्षक भारतीने दादरच्या शिवाजी मंदिरात संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यात शरद यादव बोलत होते.

यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार हितेंद्र ठाकूर, अशोक बेलसरे, रविकांत तुपकर ,संभाजी भगत आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबईच्या शिक्षकांनी इमानदारी दाखवत कपिल पाटील यांना आमदार करून चांगला संदेश दिला, देशातील सर्व मतदारांनी चांगल्या माणसांना मते देण्याचा धडा यातून घेतला पाहिजे, तरच आपण सध्याच्या अघोषित आणीबाणीचा सामना करू शकू, मनुवादी शक्तींचा पराभव करू शकू असेही यादव आपल्या भाषणात म्हणाले.

राजू शेट्टी यांनी मुंबईच्या शिक्षकांचे आभार मानत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ देण्याचे आवाहन केले. मुंबईच्या शिक्षकांनी दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि दिशादर्शक आहे. चांगुलपणावरचा माझा विश्वास तुम्ही वाढवला, चळवळी करणाऱ्यांना बळ दिले, अशा शब्दात शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या.

कपिल पाटील यांच्या विजयाने मुंबईत सुरू झालेली ही बदलाची लाट आता आपल्याला शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली देशभर पसरवायची आहे, असा संकल्प आज करूयात असे आवाहनही त्यांनी केलं. हितेंद्र ठाकूर यांनी पालघर निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग कसा केला याचा पाढा वाचला, कपिल यांच्या विजयाने चळवळीतल्या कार्यकर्त्याना राजका रणात भविष्यात चांगले दिवस येतील, असा आशावाद व्यक्त केला. कपिल पाटील यांनी सत्ता, पैसा आणि दादागिरीला ठोकरून मुंबईच्या शिक्षकांनी शिक्षणाच्या हक्कांसाठीच्या चळवळीची साथ दिलीत, त्याबद्दल शिक्षकांना सलाम केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोरे यांनी केलं.

Advertisement
Advertisement