नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांडाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. तिची हत्या तिचा पती अमित उर्फ पप्पू शाहू याने तिच्या डोक्यात बांबू घालून केली. तसेच सना हीचा मृतदेह आरोपी शाहूने आपल्या साथीदारासोबत मिळून हिरेन नदीत फेकल्याची कबुली दिली. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे सना खान २० सप्टेंबर २०२१ रोजी जबलपूरमधील नर्मदा नदीच्या बर्गी डॅम येथे फिरायला गेली होती. यादरम्यान तिने फेसबुक लाईव्ह येत आपण आपल्या मुलासह नर्मदा नदीच्या बर्गी डॅम येथे फिरायला आलो असल्याची माहिती दिली होती. तसेच ‘जय नर्मदा मैया, असा नाराही ती या व्हिडीओमध्ये लावताना दिसत आहे. मात्र याच एकेदिवशी आपली हत्या करून याच नर्मदा नदीत आपला मृतदेह फेकण्यात येईल, असा विचारही तिने त्याचवेळीस केला नसले. मात्र सना खानच्या हत्येनंतर योगायोगाने तिचा हा व्हिडीओ समोर आल्याचे सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे.
जबलपूर येथील रहिवासी असलेला अमित शाहू या वाळू तस्कर आणि दारू माफियाने सना खान हिच्याशी एप्रिल महिन्यात लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाचा फोटो नागपूर टुडेच्या हाती लागला आहे. विवाहित असलेल्या अमितची पत्नी मध्यप्रदेश पोलीस दलात नोकरीवर आहे. त्याच्या पत्नीला सनाशी असलेल्या पतीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाली.
त्यामुळे दोघांत वाद झाले होते. पती-पत्नीने एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. २ ऑगस्टला अमितचा सना खानशी वाद झाला. त्या वादातून अमितने सना खानचा खून केला. तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून हिरन नदीत फेकून दिल्याची माहिती आहे.
रविकांत कांबळे व आरती सोनकांबळे