नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे द्वारा आयोजित महागाईची दहीहंडी जय महाकाली पथकांनी फोडली वाढत्या महागाईवर लक्ष वेधण्यासाठी हिरवी नगर येथे ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती.
या दहीहंडी स्पर्धेत आदिशक्ती क्रीडा मंडळ, जय मा शितला मंडळ, जय भोलेश्वर मंडळ, जय महाकाली क्रीडा मंडळ, व राधाकृष्ण महिला मंडळाचे गोविंदा पथक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत आकर्षक मानवी मनोरे रचत जय महाकाली मंडळांनी महागाईची दहीहंडी फोडली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, खा कृपाल तुमाने, आमदार अभिजीत वंजारी, शेखर सावरबांधे, संदीप इटकेलवार, श्रीकांत घोगरे, ईश्वर बाळबुदे, तानाजी वनवे,वर्षा शामकुले ,रमन ठवकर,या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाला पुरस्कार देण्यात आले
तसेच राधाकृष्ण महिला मंडळाच्या पथकाला लक्ष्मीकांत सावरकर यांच्यातर्फे आकर्षक पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राविनिश पांडे, प्रशांत बनकर, रियाज़ शेख आकाश थेटे, विनोद निनावे,सुनील मस्के, प्रकाश मेश्राम, राहुल नारनवरे,अश्विन जवेरी, कपिल आवारे, अमित जेठे, पवन गावंडे, निलेश बोरकर, शरद शाहू, अमरीश ढोरे, रुपेश बागडे, विलास पैठणकर, गणेश आटे, कपिल शराफ, लोकेश सतीबावणे, राजेंद्र भोयर, मिलिंद वाचनेकर, राजेश पाटील, प्रकाश उपाध्यय, देवेंद्र गरडे, अनंत रंगारी, अनिल शेख,प्रशांत वांधरे, जय चावला, दीपक सलुजा, इकबाल शेख, अफजल शेख, नरेंद्र साळवे, सुशांत पाली, आशुतोष बेलेकर,वसीम लाला, सचिन बोरकर, राहुल पेठे, राजू मोरे, पिंटू मेश्राम, आकाश चिमणकर, या कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.