जेव्हा तुम्हाला लोकांचे भले करण्याची संधी तेव्हा तुम्ही घरात बसून होते. जनता समजुतदार असून उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहणार नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
नागपूर येथे बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री केवळ दोन दिवस घराच्या बाहेर पडले. तर त्यावेळी विरोधी पक्षात असणारे देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांची काळजी घेत होते. देशाच्या विकासाची प्रगतीची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पामागे जनता उभी राहील असाही दावा श्री बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीच्या राजकारणाचा आधार जनतेत संभ्रम पसरविण्याचा आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. महायुतीमधील घटक पक्षांना पूर्ण सन्मान दिला जातो. महायुतीच्या ८० टक्के जागांचा निर्णय झाला असून उर्वरित जागांवर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. महायुतीमध्ये कोणताही ताणतणाव नसून सर्वांचे एकमत आहे. दिल्लीत महायुतीची बैठकीत यावर चर्चा झाल्यावरच उमेदवारीबाबत योग्य निर्णय होईल.
• तपास यंत्रणेवर दबाव
रोहित पवार यांनी चौकशीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले, ते म्हणाले, ज्याला कर नाही तर डर कशाला! चूक केली नसेल तर ईडीच्या नोटीसचे उत्तर साधेपणाने देता येते. चौकशीअंती निष्कर्ष निघेलच. मात्र ते सोडून तपास यंत्रणांवर दबाव आण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बावनकुळे असेही म्हणाले…
• महायुतीच्या बैठकीनंतर अधिकृत माहिती समोर येणार
• राज ठाकरे हे परखड बोलणारे व्यक्तिमत्व
• मनसे आणि भाजपाची भूमिका विसंगत नाही; चर्चाही नाहीच
• पंकजा मुंडे आमच्या नेत्या; संसदीय बोर्ड निर्णय घेणार