नागपूर : भगवान श्रीकृष्ण याचा जन्मसोहळा अर्थात जन्माष्टमीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही २६ ऑगस्ट रोजी हा उत्सव ‘जय कन्हैया लाल की”च्या गजरात गजरात पार पडणार आहे.श्रावण वद्य अष्टमीला पूर्वरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.
रात्री १२ च्या मुहूर्तावर कृष्णाचा जयघोष करून जन्म झाला असे कथा कीर्तनातून घोषित केले जाते. फटाके फोडून, वाद्य वादन, टाळ-नामाचा गजर करून कृष्णजन्म उत्सव साजरा करण्यात येतो. संपूर्ण शहरातील मंदिरे आकर्षक सजावटीने सजलेली आहेत.
१८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जाईल. यात पूजेचा कालावधी ४५ मिनिटांचा असेल. साधारण ११.३० ते १२.१५ पर्यंत सर्व पूजा विधी करावेत असे सांगितले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने रविवारी श्रीकृष्ण मंदिर, गोरक्षण सभा, धंतोली येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दोलायमान शोभायात्रेत पारंपारिक गाणी आणि नृत्ये सादर केली गेली, ज्यात भगवान कृष्णाचे जीवन आणि खेळकर कृत्ये चित्रित करणाऱ्या “रासलीला”चा समावेश होता.
दरम्यान भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरा शहरातील कंसाच्या तुरुंगात देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात झाला. त्यांचा जन्म रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला. यंदा जन्माष्टमीचा हा सण रोहिणी नक्षत्रात साजरा होणार असून त्यासोबतच जयंती योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योगायोग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार असा दुर्मिळ योगायोग वर्षानंतर येतो, त्यामुळे या वर्षी जन्माष्टमी खूप खास असणार आहे.