मुंबई : जपानच्या शिष्टमंडळाने आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .
यावेळी जपानच्या एनईसी कंपनीचे अध्यक्ष डॉ. नोबूहीरो इंडो, मॅनेजिंग डायरेक्टर ताका युकी इनाब, राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.
भारतात आणि महाराष्ट्रामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी एनईसी कंपनी भारतातील पहिली लॅब मुंबई येथे सुरू करणार आहे.
या लॅबमध्ये कोर टेक्नॉलॉजीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच शहरामधील वाहतूक व्यवस्था मालवाहतुकीच्या क्षेत्रातील आव्हानांवर कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती विश्लेषकांच्या माध्यमातून उपाययोजना शोधण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी एनईसी कंपनीमार्फत मुंबईमध्ये डिसेंबर 2018 ला होणाऱ्या सोल्युशन कोरसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले.