Advertisement
मुंबई :मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे,अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असला, तरी सकाळी ९ वाजता माझ्या उपोषणाची सुरुवात होईल. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे.
सहा कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.
राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा मराठा समाजाला झालेला नाही.यामध्ये भाजपातील गरीब मराठा समाजाच्या मुलांचेही नुकसान झाले आहे. सरकारने १० टक्के आरक्षण दिले. मात्र त्यांची अंबलबजावणी अद्यापही झालेली नाही.